Breaking News

मा.आ. कोल्हें मुळेच महिलांमध्ये स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा -- रेणुका कोल्हे

मा.आ. कोल्हें मुळेच  महिलांमध्ये स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा -- रेणुका कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
    चुल आणि मूल एवढेच स्त्रीचे विश्व नाही तर, या पलिकडेही तिच्या जगण्याला बळ देण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून बचत गटांच्या महिलांना ख-या अर्थाने सक्षम बनविण्याचे काम माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे, त्यामुळेच कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी केले.
      शिंगणापूर येथील साई संजीवनी महिला स्वयंसहायता बचत गटाने उत्पादित केलेल्या इस्टंट ढोकळा पीठाची निमिर्ती करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले, या उत्पादनाच्या विक्रीचा शुभारंभ सौ रेणुका कोल्हे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला, यावेळी त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना संघटीत करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे काम ख-या अर्थाने संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये विविध प्रकारचे स्वयंरोजगार करण्याचे धाडस निर्माण झाले, त्यातून त्यांची मोठया प्रमाणात आर्थीक प्रगती झाली. साई संजीवनी गटाच्या सौ अपर्णा जाधव आणि सौ छाया आदमने या मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, स्त्रीचे मध्ये अनेक गुण आहेत, परंतू त्या कलागुणांना वाट दाखविण्याचे काम माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी केले, त्यातूनच आम्हांला प्रेरणा मिळाली असून गेल्या ७ वर्षापासून कार्यरत असलेल्या साई संजीवनी बचत गटाच्या माध्यमातून आम्हांला आणखी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यात यश आले, या उत्पादनाच्या विक्रीचा शुभारंभ सौ रेणुका कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते करता आला,याचा आम्हांला अभिमान वाटतो.