Breaking News

मामांनी व आजोबांनी केली नातवाची निर्घृण हत्या

राजूर/प्रतिनिधी :
        वाकी शिवारातील त्या अज्ञात सापडलेल्या मृतदेहाची तपासा अंतर्गत,आजोबा व मामाने केली नातवाची निर्घृण हत्य शेवटी त्या अज्ञात झालेल्या घृन हत्याकांडाला  काही तासांत मिळणार न्याय, राजूर पोलिसांचे मोठे यश अखेर त्या अज्ञात खुनाचा तपास लावण्यास अवघ्या चोवीस तासात अहमदनगर पोलिस पोलीस प्रशासन व राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना यश मयत व्यक्ती प्रदीप सुरेश भांगरे व त्याचे मारेकरी सख्या आईचे वडील व भाऊ असल्याचे सूत्रानुसार समजलेली माहिती समोर आली आहे.आजोबा कमलाकर हनुमंत डगळे (वय वर्ष ७०) मामा हरी कमलाकर डगळे.अकोले तालुक्यातील वाकी परिसरात कृष्णावंती नदित एका २५ वर्ष तरुणाचे तुकडे-तुकडे करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती.
      या घटनेने जिल्ह्यात व तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.मात्र या गुन्हाचा शोध लावणे हे मोठे आव्हाण असताना अहमदनगर व राजूर पोलिसांनी आव्हान स्वीकारून मयताची ओळख आवघ्या २४ तासांत पटवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.यात अहमदनगरचे एलसीबी पथक अकोले पोलीस स्टेशनचे एक पथक, संगमनेर येथील एक पथक,यांनी देखील मोलाची कामगिरी केली आहे.त्यामुळे अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लागला असून  पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.