Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची शंभरी पार !

 श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची शंभरी पार !

श्रीगोंदा/प्रतिनिधी :
कोरोनाला रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान, चिंता वाढली आरोग्य यंत्रणा मात्र खंबीरपणे करतेय सामना  श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी दि 25  राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना या काळात सुरक्षित असणारा श्रीगोंदा तालुका आता मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून श्रीगोंदा तालुक्याने आज कोरोना रुग्णांची शंभरी ओलांडली आहे श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 102 इतकी झाली आहे आज एका दिवसात श्रीगोंदा तालुक्यातील मेंगलवाडी राजापूर -1, हिंगणी दुमाला-1, उककडगाव-2, काष्टी-1, निमगावखलू-1 असे  एकूण 6 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 102 इतकी झाली आहे सध्या 43 रुग्ण श्रीगोंदा येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असून 59 रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिली. तरी सर्वांनी आपआपली काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य  अधिकारी यांनी केले आहे.