Breaking News

पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह !

पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह ! 
कान्हूर पठार येथील एक अहवाल पोजिटीव्ह तालुक्यातील 49 अहवाल निगेटिव्ह !
तुम्ही सर्व माझ्यावर जे मोठ्या ताईसारखे प्रेम करतात त्याची ही पावती आहे.  मी यापुढे अधिक काळजी व ऊर्जेने सेवा करेल 


तुम्ही सर्व माझ्यावर जे मोठ्या ताईसारखे प्रेम करतात त्याची ही पावती आहे. 
----------
मला थोडे व्हायरल इन्फेक्शन याच काळात झाल्याने चिंता वाटत होती.पण सकारात्मक राहुन वैद्यकीय उपचार सुरु करुन खबरदारीचा उपाय म्हणुन स्वब तपासणी करुन घेतली. मा.राज्यमंत्री महोदय यांचे स्वागत करताना शिष्टाचाराचा भाग म्हणुन नकळत मी मास्क व चष्मा काढला होता..तेव्हा स्वत:साहेबांनी मला आधी मास्क लावा मॅडम म्हणुन सांगीतले.कदाचित त्यांच्या सुचनेमुळे अनर्थ टळला आहे.
त्यामुळे सर्वांनी मास्क वापरा.हीच विनंती.
मा. जिल्हधिकारी व प्रांताधिकारी आमदारसाहेब व सर्वांनी जी काळजी घेतली ती जपुन ठेवेल व यापुढे अधिक काळजी व ऊर्जेने सेवा करेल.
-------
ज्योती देवरे - तहसीलदार पारनेर


 पारनेर/प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार मध्ये एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे तर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह तालुक्यातील एकूण 49 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर
दैठणे गुंजाळ 3 पानोली 16 सुपा 5 राळेगण सिद्धी 5 कान्हूर पठार 13 ढवळपुरी 5 पारनेर 1 करंदी 1 हे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत 
तहसीलदार ज्योती देवरे या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दि 19 जुलै रोजी संपर्कात आल्या होत्या त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्कात आल्या होत्या ते पॉझिटिव्ह आले त्यानंतर तहसीलदार देवरे यांना त्रास जाणवत असल्याने त्या सुपा येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये  व्हायरल इनफेक्श वर डॉ बाळासाहेब पठारे यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती  चांगली आहे. तेथे कोरोना  चाचणीसाठी स्राव दिला अहवाल निगेटिव्ह आला आहे सध्या तहसीलदार ज्योती देवरे यांची प्रकृती चांगली आहे.