Breaking News

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

नेवासा/तालुका प्रतिनिधी
राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शंकरराव गडाख हे नेवासे येथील आमदार आहेत. गडाख यांचे गाव असलेले  सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून परिसरात तपासणी करण्यात येत आहे.