Breaking News

युवकांनी पुढे येऊन रक्तदान सारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हा.- विवेक कोल्हे

युवकांनी पुढे येऊन रक्तदान सारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हा.- विवेक कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे जगासह देशभरात रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, महाराष्ट्रातही कोरोना आजाराच्या संकटाला आपणही सामोरे जात आहोत, या कालावधीत रक्ताचाही मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
    तालुक्यातील मुर्शतपूर येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उदघाटन श्री विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,रामदास शिंदे, माजी सरपंच दिलीप शिंदे, मुर्शतपूर सोसायटीचे चेअरमन रंगनाथ उगले, मधुकर उगले, साहेबराव शिंदे, सुधाकर शिंदे, प्रकाश दवंगे, तिं्रबक दवंगे, अन्वर शेख, सिताराम तिपायले, जालींदर शिंदे, माजी सभापती सुनिल देवकर, पत्रकार सुरेश रासकर, दगुजी चौधरी, दिपक चौधरी, संदीप गुरूळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
    यावेळी श्री विवेक कोल्हे यांचे हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले, त्यावेळी ते पुढे म्हणाले, सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग महत्वाचा असून आज राज्यावर ओढावलेल्या संकटामुळे प्रत्येकाने जागृत रहाणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून मतदार संंघामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे, या शिबीरास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेही श्री विवेक कोल्हे म्हणाले, संजीवनी ब्लड बँकेच्या डॉ. निता पाटील यांचे या शिबीरास विशेष सहकार्य लाभले.