Breaking News

नाराजी अर्धी दूर झाली प्रत्यक्ष अमलात आल्यानंतर पूर्ण दूर होईल - अण्णा हजारे !

नाराजी अर्धी दूर झाली प्रत्यक्ष अमलात आल्यानंतर पूर्ण दूर होईल - अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ त्यांची सकारात्मक चर्चा आमदार निलेश लंके यांच्या शिष्टाई ला यश !
पारनेर प्रतिनिधी -
 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन भेट घेतली प्रशासक नेमणूकी च्या शासनाच्या निर्णया बाबत जवळपास अर्धा तास चर्चा केली याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले तसेच अण्णा हजारे यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अर्धी नाराजी दूर झाली आहे तसेच मागण्या मान्य झाल्यानंतर पूर्ण नाराजी दूर होईल असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे त्यामुळे राळेगणसिद्धी येथे पालकमंत्र्यांची अण्णा हजारे पहिलीच झालेली चर्चा व त्यात आमदार निलेश लंके यांची केलेल्या शिष्टाई ला यश आले आहे
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप असलेली परिपत्रक रद्द करून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणेबाबत अण्णा हजारे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे झालेल्या चर्चेत मागणी केली प्रशासक म्हणून  अधिकारी व कर्मचारी यापैकी असावा हे मान्य केलं आहे ते आमलात कसे यायचे ते पाहिचे आहे असे हजारे यांनी म्हटले आहे दुर्देवाने पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने प्रशासक नियुक्तीच्या धोरणामुळे गावपातळीवर सत्तेचे केंद्रीकरण होण्याचा धोका अधिक वाढतो सत्तेचा वापर दुष्ट हेतूने स्वैरपणे पक्षपाती पणे व बेफिकिरीने नसावा तर तो लोकशाहीवादी असावा लोकशाहीचे हसू होईल असा तर नक्कीच नसावा म्हणून पंचायतीच्या निवडणुका मोकळ्या निकोप आणि पारदर्शी पद्धतीने होणे आवश्यक आहे परंतु राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या प्रशासक नियुक्त झाल्यास तशा निवडणुका होण्याची शक्यता नाही ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करायचे झाल्यास शासनाकडे विस्तार अधिकारी व कर्मचारी संख्या कमी आहे मात्र न्यायालयाने 2005 या निकालात दि 22 जुलै रोजी पुन्हा अंतरिम आदेशात म्हटले आहे की शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक पदावर नियुक्ती करण्यात यावी अशा परिस्थितीत संख्या कमी असेल तर इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करता येऊ शकेल पालकमंत्री यांच्या सल्ल्याने जर एखादा व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्त केली तर पालकमंत्री ज्या राजकीय पक्षाचा असेल त्याच पक्षाची व्यक्ती प्रशासक म्हणून निवडली जाण्याची शक्यता आहे अशी व्यक्ती प्रशासक पदाचा दुरुपयोग करु शकते तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा गैरफायदा घेऊ शकते त्यामुळे 2005 च्या निकालात म्हटल्यानुसार थेट जी गोष्ट साध्य होऊ शकणार नाही ती शासनाकडून वेगळ्या पद्धतीने साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे शासकीय परिपत्रकातून दिसते या प्रकारचे चर्चेतील महत्वाचे मुद्दे होते त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी म्हटले आहे की हायकोर्टात याबाबत याचिका दाखल आहे सोमवारी त्याचा अंतिम निकाल लागणार आहे तसेच सरकारी अधिकारी जे असतील त्यांना प्राधान्याने प्रशासक नेमले जाईल त्यानंतर काय करायचं याबाबत सोमवारी न्यायालय निकाल देणार आहे.
ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून गाव समृद्ध करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे राळेगण-सिद्धी हे गाव कमी पाऊस असताना कशा पद्धतीने गावाचा विकास झाला याबाबतीत यांचे मार्गदर्शन राज्यातील दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी मी येथे आलो होतो त्यासंदर्भात पुन्हा येथे येणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी आ.नीलेश लंके,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,प्रातिधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, पारनेर शहराध्यक्ष कविता औटी,उद्योजक सुरेश धुरपते, अ‍ॅड. राहुल  झावरे, जयसिंंग मापारी, दत्ता आवारी ,अरूण पवार, सरपंच ठकाराम लंके, बापूसाहेब शिर्के, विलास सोबले,दिनेश औटी,संदीप चौधरी,दत्ता कोरडे, बाजीराव कारखिले,आदी उपस्थित होते.

  कोरोनामुळे १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतचे निवडणुका होऊ शकत नाहीत त्यामुळे शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली आहे तिची सुनावणी सोमवारी होणार आहे येणारा निकाल आम्हाला मान्य राहणार आहे ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथे आलो होतो व पुन्हा येथे येणार आहे
-----
हसन मुश्रीफ 
ग्रामविकास मंत्री


आंदोलन करू असा इशारा दिला होता मात्र आता झालेल्या चर्चेवरून ती वेळ येणार नाही असे दिसत आहे  आपल्या मागण्या हे सरकार मान्य करील अशी अपेक्षा आहे याबाबत आपण पन्नास टक्के सध्या समाधानी आहे मागण्या पूर्ण झाल्यावर पूर्ण समाधान होईल
------
अण्णा हजारे 
ज्येष्ठ समाजसेवक 


  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचा गृहपाठ कच्चा व निर्णय बदला अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची भूमिका महत्वाची होती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा नगर दौरा असल्याने त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून नियोजन केले त्यानुसार आमदार लंके यांनी सकाळीच अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे या बैठकीसाठी मन वळवले होते त्यानंतर पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत अण्णा हजारे हे ही समाधानी आहेत त्यामुळे आमदार लंकेची शिष्टाई सफल झाली आहे.