Breaking News

मुबंई येथे मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या वडनेर बुद्रुक येथील व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी घेतले ताब्यात

पारनेर/प्रतिनिधी : 
 पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील ४५ वर्षीय महिलेचा मुंबई येथे कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्यानंतर तिचा अंत्यविधी करण्यात आला त्यानंतर त्या महिलेचे पती मुलगी व इतर कुटुंबातील सदस्य हे गावी वडनेर बुद्रुक येथे आले होते त्यांना शाळेमध्ये विलगीकरण कक्षामध्ये कोरंटाईन करण्यात आले होते दि 5 रोजी त्यातील काही सदस्यांना त्रास होत असल्याने कोरोना चाचणी साठी स्राव घेतले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
        पारनेर तालुक्यातील  वडनेर बुद्रुक येथील शाळेमध्ये कोरंटाईन केलेल्या व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून असल्यामुळे त्यांना तपासणीसाठी पारनेर येथे आणण्यात आले त्यांचे स्राव घेतले आहेत.
कोरंटाईन केलेल्या कुटुंबातील महिलेचे मुंबईमध्ये  कोरोना मुळे तीन दिवसापूर्वी निधन झाले होते त्यानंतर हे लोक मुंबईहून गावी आले होते त्यांना गावातील विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते.
      तसेच त्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी वडनेर बुद्रुक येथून काही व्यक्ती गेल्या होत्या त्यांना देखील संशयित म्हणून तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे
सर्व नागरिकांना जाहिर अहवान करण्यात आली सदर व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत सर्व गावातील अत्यावश्यक मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी तसेच कोणीही घराबाहेर पडू नये अशी सूचना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.