Breaking News

खाजगी किंवा शासकीय लॅब मध्ये कोरोना संशयितांनी स्राव दिले तरी त्यांना यापुढे पारनेर येथील सेंटरमध्ये अहवाल येईपर्यंत थांबावे लागणार - तहसीलदार ज्योती देवरे !

खाजगी किंवा शासकीय लॅब मध्ये कोरोना संशयितांनी स्राव दिले तरी त्यांना यापुढे पारनेर येथील सेंटरमध्ये अहवाल येईपर्यंत थांबावे लागणार - तहसीलदार ज्योती देवरे
पारनेर प्रतिनिधी - 
दैठणे गुंजाळ येथील तरुणांनी कोरोना चाचणी साठी स्राव देण्यासाठी नकार दिला होता त्याबाबत माहिती पोलिस प्रशासनाला तहसीलदार पारनेर यांनी कळवली त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलताच तरुणांनी कोरोना चाचणी साठी शासकीय व खासगी लॅबमध्ये स्राव दिले मात्र त्यानंतर त्यांना लेडीज होस्टेल येथे कोविड सेंटर मध्ये  दाखल करावे असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
दैठणे गुंजाळ च्या आठ जणांनी कोरोना चाचणीसाठी नकार दिला होता मात्र तहसीलदार यांनी पोलिस प्रशासनाला याबाबत कळवले त्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलताच या आठही जणांनी चाचणी देण्यासाठी तयारी दर्शवली शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी लॅब मध्ये स्राव  दिले आहेत मात्र स्राव दिल्यानंतर त्यांनी होम क्वारंटाईन होऊ असे सांगितले मात्र होम क्वारंटाईन न होता त्यांना त्वरित पारनेर येथील लेडीज होस्टेल मध्ये असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये दाखल करावे
हे तरुण  होम क्वारंटाईन होत असले तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही म्हणून त्यांना पारनेर येथील सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे
यापुढे कोरोना संशयितांनी प्रायव्हेट मध्ये कोरोना चाचणी साठी स्राव दिले असले तरी त्यांनी त्वरित प्रशासनाला याबाबत माहिती कळवावी व त्यांनी covid-19 सेंटर पारनेर येथे माहिती द्यावी व तेथे विलगीकरण कक्षामध्ये थांबावे
प्रायव्हेट ला स्राव दिल्यानंतर असे संशयित त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील तरच तिथे त्यांना राहता येईल अन्यथा त्यांनी पारनेर येथील covid-19 सेंटरमध्ये दाखल व्हावे
तसेच संबंधित संशयित ज्या गावातील असतील त्या गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांची माहिती घेऊन त्यांना पारनेर येथे सेंटरमध्ये दाखल करावे. पोलिसांनी या कामी त्यांना मदत करावी.
असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.