Breaking News

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा.!

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी : 
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२०  मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेट वर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. कु. रुद्रभाटे ऋचा उदय या विद्यार्थिनीला गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळालेले आहे.
१ रुद्रभाटे ऋचा उदय एकूण टक्के - ८९.६९  %
२ जाधव संकेत शिवाजी एकूण टक्के - ८७.६९  %
३ शेटे पल्लवी योगेश एकूण टक्के - ८५.८४  %
 
१२ वी वाणिज्य  शाखेचा निकाल ९१.१८ % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१ आभाळे कविता बाबासाहेब एकूण टक्के -  ८९.८४ %
२ चौधरी अजय नारायण एकूण टक्के -  ८९.०७ %
३ देसाई पूजा अनिल एकूण टक्के -  ८८.१५ %
 
१२ वी कला शाखेचा निकाल ७२.१० % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१ शिंदे दीपक रतन एकूण टक्के - ८२.६१ %
२ दोडके सपना बबन एकूण टक्के - ७९.३८  %
३ साबळे गौरी मधुकर एकूण टक्के - ७७. ६९ %
 
महाविद्यालयाचा एकूण कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा मिळून निकाल ८९.७५ % इतका लागलेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव रोहमारे, उपाध्यक्ष मा. श्री. रामदास पा. होन, सचिव मा. श्री. ऍड. संजीव कुलकर्णी, श्री. संदीप रोहमारे, संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने kjs.vriddhionline.com या वेबसाईट वर सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट  करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए._सीए., बी. सी.एस., बी. एस. एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) इत्यादी चालू आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आवाहन केले आहे