Breaking News

प्रवरानगरला एक रुग्ण ,गोगलगावला एक रुग्ण तर बाभळेश्वर ला एकूण पाच रुग्ण कोरोना बाधित.!

प्रवरानगरला एक रुग्ण ,गोगलगावला एक रुग्ण तर बाभळेश्वर ला एकूण पाच रुग्ण कोरोना बाधित.!
कोल्हार/प्रतिनिधी :
    प्रवरानगर येथील एका ६० वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीपाद मैड यांनी दिली.
     प्रवरानगर येथील हे व्यक्ती तीन-चार दिवसांपासून ताप,सर्दी, खोकला या आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर लोणी येथील एका खाजगी डॉक्टरकडे उपचार सुरू होते परंतु उपचार करूनही ह्या व्यक्तीला बरे वाटत नव्हते त्यामुळे या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टर मैड यांनी सांगितले.
कोरोना बाधित व्यक्ती लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल मध्ये कामाला आहे या व्यक्तीच्या संपर्कातील 11 व्यक्तींना शिर्डी येथे कोरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले आहे रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व आजपासून 6 ऑगस्टपर्यंत या परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद व ये- जा बंद करण्यात आली आहे तसेच गोगलगाव येथे १ कोरोना बाधित आढळून आला असल्याचे डॉक्टर मैड यांनी सांगितले.
व बाभळेश्वर येथे पाच जण कोरोना बाधित आढल्याची माहिती कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ संजय घोलप यांनी दिली.