Breaking News

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने आज दुपारनंतर जोरदार आवक !

राहुरीशहर/प्रतिनिधी : 
  नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने आज दुपारनंतर पहिलीच जोरदार आवक सूरु झाली असून कोतुळ जवळील लहित येथे ३ हजार २१२ क्यूसेक ने आवक सुरु होती.
  ४ जुलै पासुन कोतुळ कडील नदी वाहती झाली तेव्हा १ हजार २०० क्यूसेक ने आवक सुरू झाली , मुळा धरण सध्या ३० टक्के भरलेले असून धरण साठा आठ टीएमसी इतका आहे.