Breaking News

कोरोनाचा प्रवास कोपरगाव तालुक्यात जोरात !

कोरोनाचा प्रवास कोपरगाव तालुक्यात जोरात 
करंजी प्रतिनिधी- 
   काल ३० जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील एकूण १६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असता त्यांचा संपर्कातील एकूण १० जणांचे अहवाल नगर येथे पाठवले असता त्या पैकी ३ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले व ७ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ के डी फुलसौंदर यांनी सांगितले आहे.  
   ३१ जुलै ची सकाळ उजडताचा कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आसून यात कोपरगाव शहरातील राम मंदिर रोड परिसरात ३५ वर्षीय महिला व लक्ष्मीनगर परिसरात ३५ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळुन आली आहे.
        त्यासोबतच कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागातील सुरेगाव या गावात देखील कोरोना थांबता थांबेना या गावातील ४२ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळुन आली आहे.
       असाच कोरोनाचा वेग जर सुरू राहील तर कोरोना शंभरी पार करू शकतो यात शंका नाही त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही कोपरगाव करानो शहरातील गर्दी टाळा गरज असेल तेहवाच बाहेर पडा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा यातच आपले व परिवाराचे हित आहे.