Breaking News

अंचलगाव शाळेच्या संरक्षक भितींचे कामात माती मिश्रीत वाळु, काम बंद करण्याचे ठेकेदाराला अधिका-यांचे आदेश !

अंचलगाव शाळेच्या संरक्षक भितींचे कामात माती मिश्रीत वाळु, काम बंद करण्याचे ठेकेदाराला अधिका-यांचे आदेश 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
   कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षक भिंतींचे काम सध्या चालु असुन त्या कामासाठी ठेकेदाराने माती मिश्रीत वाळुचा वापर चालु केल्याने ते काम अधिका-यांनी बंद करण्याची सुचना ठेकेदाराला दिल्या तर संरक्षक  भिंतींचे काम दर्जेदार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अंचलगाव जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी दोन लाख रुपये अंदाजपञकींय खर्च  असुन  हे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्या कामासाठी गावाजवळुनच जाणाऱ्या नारंदी नदीतील माती मिश्रीत वाळु टाकली संरक्षक भिंतीच्या कामालाही हीच दर्जाहिन वाळु वापरण्यास सुरुवात केली माञ काही जागृत नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी  पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.सी.पवार यांना सदर कामाचे व दर्जाहीन वाळुचे फोटो काठून पाठवले उपअभियंता यू.सी,पवार यांनी तत्काळ काम थांबवण्याचे आदेश देत प्रत्यक्ष अभियंत्याला या कामावर  निरीक्षणासाठी पाठविणार असल्याचे श्री.पवार यांनी  आमच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले  तर ठेकेदाराला चांगल्या प्रतिची वाळु मटेरियल वापरण्यास सांगणार आसल्याचे अंचलगावचे ग्रामसेवक भिमराज बागुल यांनी  सांगितले. 
    कामासाठी एकदा निधी मिळाल्या नंतर परत ते काम लवकर होत नाही त्यासाठी मिळालेल्या निधीत दर्जेदार काम करुन घेतले तर ते चिरकाल टीकते त्यासाठी गावात होत असलेली कामे दर्जेदार करावी एवढीच ग्रामस्थांची मागणी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.