Breaking News

पाडळी दर्या येथे कोरोना बाधित,गारखिंडी येथील एका व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू ?

पाडळी दर्या येथे कोरोना बाधित,गारखिंडी येथील एका व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू ?
पारनेर/प्रतिनिधी-
     पारनेर तालुक्यातील कोरोनाची संख्या  वाढत आहे.  आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पाडळी दर्या येथील एका व्यक्ती चा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे
तसेच 8 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. किन्ही 2 सोबलेवाडी 1 कासारे 1 पाडळी दर्या 1 ढवळपुरी 1 आळकुटी 2 या पाच गावातील आठ व्यक्तींचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहेत.
   दरम्यान गारखिंडी येथील 65 वर्षीय एक व्यक्ती काही दिवसापूर्वी आजारी असल्याने नगर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना काल रात्री त्या व्यक्तीचा मृत्यू  झाला त्या  व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पोजिटीव्ह आला असल्याचे कुटुंबातील व्यक्तीचे म्हणणे आहे. असे डॉ प्रकाश लाळगे यांनी सांगितले परंतु प्रशासनाकडे तसा अहवाल आद्यप प्राप्त झाला नाही.
    कारण हृदयविकार असल्याचे समजते मात्र कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचा संशय नातेवाईकांना आहे त्यामुळे कुटुंबातील काही व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.
पाडळी दर्या व गारखिंडी हे दोन्ही गाव तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. कोरोना बाधित व्यक्ती आढळलेला 100 मी परिसर 14 दिवसासाठी कॅटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.