Breaking News

पारनेर चा ऑनलाईन शाळेचा पॅटर्न शरद पवार यांना चांगलाच भावला !

ऑनलाईन शाळेच्या पारनेर पॅटर्नने शरद पवार प्रभावित !
---------
शिक्षण मंत्र्यांशी आमदार निलेश लंके यांची चर्चा त्यांनी दिल्या आयुक्तांना सूचना
---------
पारनेर च्या ऑनलाईन पॅटर्न कडे राज्याचे लक्ष!
--------
आ. नीलेश लंके व तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी घेतली मुंबईत भेट !
मुंबई - शरद पवार यांच्या सुचनेनंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील ऑनलाईन शाळा उपक्रमाची सविस्तर माहीती घेतली.

पारनेर  प्रतिनिधी -
 कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर गेल्या चार महिन्यांपासून विदयार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने तयार करण्यात आलेला ऑनलाईन शाळेचा पारनेर पॅटर्न गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला.
तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सहकार्यातून ऑनलाईन शाळेसाठी तयार केलेल्या सॉफटवेअरची माहीती आमदार नीलेश लंके यांनी गुरूवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे पवार यांची  भेट घेउन  दिली. तब्बल अर्धा तास विविध बाबींची माहीती घेतल्यानंतर पवार यांनी यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करून विषय समजावून घेण्याच्या सुचना दिल्या. या सॉफटवेअरचा फायदा राज्यातील सर्व विदयार्थ्यांना झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्याकडून तांत्रीक माहीती घेतल्यानंतर पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशीही चर्चा केली. प्रत्यक्ष शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण देताना काय अडचणी येतात ? त्या कशा सोडविल्या ? याची विचारणाही पवारांनी केली. यापूर्वी विविध शिक्षक व्हॉटस् अ‍ॅप च्या मध्यमातून विदयार्थ्यांना शिक्षण देत होते. परंंतू दिलेला अभ्यास विदर्थ्यांनी केला  किंवा नाही ? हे समजत नव्हते. नव्याने विकसीत करण्यात आलेल्या सॉफटवेअरमध्ये विदयार्थ्याने किती प्रश्‍नांचा अभ्यास केला ? किती विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी ऑनालाईन हजेरी लावली ? विदयार्थ्यास एखादया विषयाचे किती अकलन झाले याची संपूर्ण माहीती या सॉफटवेअरमध्ये असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही तात्काळ वेळ  देत विषय समजावून घेतला. शिक्षण विभागाच्या  अधिका-यांना या उपक्रमाची माहीती देण्याच्या सुचना करतानाच या उपक्रमासंदर्भात पुणे येथे शिक्षण संचालक तसेच शिक्षण आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भातही मंत्री गायकवाड यांनी सुचना दिल्या. बैठकीचा दिवस निश्‍चित झाल्यानंतर आ. लंके व शिक्षक गुंड हे या बैठकीस उपस्थित राहून या सॉफटवेअरसंदर्भात सविस्तर माहीती देणार आहेत.

पारनेरच्या पॅटर्नकडे राज्याचे लक्ष !
डिजीटल स्कुल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संदीप गुंड यांनी आमदार नीलेश लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याने ऑनलाईन शाळेच्या पारनेर पॅटर्नकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. डिजीटल शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबददल गुंड यांना तिन राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आले असून असा गौरव होणारे गुंड हे देशातील एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.