Breaking News

मिरजगावमध्ये कोरोनाचा दुसरा बळी !

मिरजगावमध्ये कोरोनाचा दुसरा बळी
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. बुधवारी बगाडे गल्ली येथे आढळून आलेल्या ५३ वर्षीय पुरूषाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश दराडे यांनी दिली.

दोनच दिवसापूर्वी मिरजगाव येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याने मिरजगाव शहरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.