Breaking News

कोरोना काळामध्ये डॉ. श्रीकांत पठारे त्यांची सेवाभावी वृत्ती पारनेर येथे ओंकार हॉस्पिटल मध्ये यशस्वी मोफत प्रसूती.

कोरोना काळामध्ये डॉ. श्रीकांत पठारे त्यांची सेवाभावी वृत्ती पारनेर येथे ओंकार हॉस्पिटल मध्ये यशस्वी मोफत प्रसूती.
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले असल्यामुळे तेथील कोरोना आजारा व्यतिरिक्त इतर सुविधा खाजगी रुग्णालयात वर्ग करण्यात आल्याचे आदेश तहसीलदार मार्फत देण्यात आले होते त्यानुसार डॉ.पठारे यांच्या ओंकार हॉस्पिटल मध्ये मोफत प्रसूती करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे डॉ.पठारे यांच्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेची पहिलीच मोफत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.
   पारनेर येथे ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटल सुरू करण्यात आल्यामुळे तेथील सुविधा खाजगी डॉक्टरांना विभागून दिली त्यात डॉ.श्रीकांत पठारे यांच्या ओंकार हॉस्पिटलमध्ये प्रसूती गरोदर स्त्रियांची तपासणी व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अत्यावश्यक सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया इत्यादी देण्यात आले त्याप्रमाणे महिलेची नुकतेच प्रसूती त्यांनी मोफत केली आहे.
सौ. कल्याणी  संपत  बोरुडे,  लोणी हवेली हि महिला दि 20 रोजी ओंकार हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी ॲडमिट झाली होती प्रसूतीदरम्यान काही अडचणी आल्या मात्र त्यावर डॉक्टरांनी यशस्वी मात केली प्रसूतीसाठी चा खर्च संबंधित महिलेकडून घेतला जाणार नाही त्यामुळे पारनेर येथील डॉ पठारे यांनी सामाजिक भावनेतून कोरोना काळामध्ये दाखवलेले हे उदारदायित्व खूप महत्त्वाचे आहे महिला व बाळ दोन्ही सुखरूप असून या महिलेने व तिच्या कुटुंबातील सर्वांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

 डॉ श्रीकांत पठारे यांनी दाखवलेली सेवाभावी वृत्ती ही खूप महत्त्वाची आहे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशासनाला कोरोना काळामध्ये केलेले सहकार्य ही खूप चांगली बाब आहे शासकीय रुग्णालया प्रमाणे तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचे कोरोना संकट काळामध्ये सहकार्य लाभले आहे सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना वर यशस्वी मात करू शकतो.
----------
ज्योती देवरे
तहसीलदार पारनेर

   डॉ.श्रीकांत पठारे हे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी सामाजिक कार्यामध्ये हातभार लावलेला आहे कोरोना काळामध्ये त्यांनी तालुक्यातील रुग्णांसाठी ठेवलेली ही मोफत सुविधा ही खूप महत्त्वाची आहे ग्रामीण भागामध्ये रुग्णांवर उपचार व्हावी म्हणून त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये मोठी जबाबदारी घेतली आहे व ते यशस्वीरीत्या ही जबाबदारी पार पाडत आहेत त्यातूनच त्यांनी या महिलेची प्रसुती यशस्वीरीत्या केली आहे याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.