Breaking News

पाथर्डी शहर प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन घोषित.

१० जुलै पर्यत शहर पूर्णतः लॉकडाऊन किराणा,भाजीपाला घरपोच मिळणार

अभिजित खंडागळे
पाथर्डी प्रतिनिधी :
       शहारातील वानभाऊनगर येथे राहणाऱ्या व सध्या ठाणे येथे चालक म्हणुन काम करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला असून,तहसीलदार नामदेव पाटील यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार १० दिवसांतकरिता पाथर्डी शहर पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आला.याच पार्श्वभूमीवर आज पाथर्डी शहर कडकडीत लॉकडाऊन ठेवण्यात आले असले तरी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या या निर्णयाचे काहींनी समर्थन केले आहे.तर काहींनी नाराजी व्यक्ती केली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित व्यक्ती हा ठाणे येथे चालक म्हणुन काम करतो.१५ दिवसांपुर्वी संबधीत व्यक्ती शहरातुन आपल्या कामावर गेली असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडुन मिळत आहे.त्यानंतर मंगळवारी गावाकडे येताना त्याला त्रास होत असल्याने तो अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.त्यांचा अहवाल मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी पाथर्डी तालुक्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी शहर कॅनटेनमेंट झोन म्हणुन घोषित केले असुन १० दिवसांकरिता शहर पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे.या लॉकडाऊन काळात  नागरीकांना किराणा,भाजीपाला घरपोच मिळणार आहे