Breaking News

पिंपळगाव रोठा येथील एक जण पुन्हा कोरोना बाधित.

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात तीन कोरोना बाधित. तालुक्याची चिंता वाढली.
पारनेर/प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील मुंबईहून आलेली 48 वर्षीय एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
     पारनेर तालुक्यांमध्ये दिवसभरामध्ये दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या असून पिंपळगाव रोठा येथील ही तिसरी व्यक्ती कोरणा बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे एकाच दिवसात  तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली तालुक्यात कोरोना बाधित संख्या वाढली आहे पिंपळगाव रोठा येथे यापूर्वी सहा जणांना कोरोना ची बाधा झाली होती मात्र १ जुलै रोजी ही व्यक्ती मुंबईहून आली होती या व्यक्ती ला संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते  त्रास जाणवत असल्यामुळे  कोरोना चाचणीसाठी स्राव घेण्यात आला होता त्यानुसार अहवाल प्राप्त झाला आहे त्यात ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी यापूर्वी  १४ दिवसांठी पिंपळगाव रोठा बंद केलेले आहे.