Breaking News

केडगाव मधील शाहू नगर नंतर आता भूषण नगर लॉक डाऊन !

केडगाव मधील शाहू नगर नंतर आता भूषण नगर लॉक डाऊन !
अहमदनगर :
       कोरोना बाधितांची वाढती संख्या व मृत्यूचा वाढता असलेला दर पाहता मनपा आयुक्तांनी आज भूषण नगर चा भाग कंटेनमेंट तर आसपास सहभाग बफर झोन म्हणून घोषित केला आहे 
     सायंकाळी चार वाजल्यापासून दिनांक 2 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत म्हणजे चौदा दिवस या भागातील सर्व प्रकारची दुकाने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाहतूक अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत नगर पुणे हायवे वरील केडगाव ची वाटचाल लॉकडाऊन च्या दिशेने सुरू झाली आहे. स्थानिक नगरसेवकांनी ही लॉकडाऊन ची मागणी केल्यानंतर महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी पाहणी केली दरम्यान केडगावात या घडीला 30 कोरोनाग्रस्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे भूषण नगर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. केडगाव मध्ये डोकेवर काढलेल्या कोरोनाव्हायरसला केडगावकरांनी मध्यंतरी काही काळ रोखले मात्र बाजार समितीच्या आवारातून पुन्हा त्याचा केडगावात फैलाव सुरू झाला एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना ची बाधा झाली असून भूषण नगर, जुन्या गावठाणात ही कोरोनाने शिरकाव केला आहे भूषण नगर, सुशांत नगर ,पाटिल कॉलनी ,वडार गल्ली या जुन्या गावठाण भागात कोरोनाची बाधा झाली आहे. 
       केडगावात अर्धशतक मारले आहे आज मितीला तीस बाधित ऍक्टिव्ह असल्याने केडगाव लॉकडाऊन करावे अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती त्यानुसार महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या भागाची सकाळी पाहणी केली त्यानंतर भूषण नगरचा काही भाग सील करण्यात आला आहे.