Breaking News

करंजी येथे खुले आम अवैद्य दारु विक्री !

करंजी येथे खुले आम अवैद्य दारु विक्री !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील बाजारपेठेचे गाव असलेल्या करंजी येथे अवैद्य दारु धंदे वाढले असुन या धंद्यांना  पोलिसांचेच अभय असल्याने  या अवैद्य धंद्या विरोधात व यांना पाठीशी घालणाऱ्यां संबंधी  जिल्हा पोलिस प्रमुख यांना लवकरच  भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे गावातील जागृत तरुणांनी सांगितले.
     करंजी हे परिसरातील तीन ते चार गावांचे केंद्रस्थान असल्याने या ठीकाणी कायम माणसांची वर्दळ असते मुख्य चौक असलेल्या ठीकाणासह गावात दहा ते पंधरा ठीकाणी गावठी तर दोन ठीकाणी अवैद्य देशी दारुचे अड्डे असुन याची कल्पना पोलिसांनाही आहे एक दोन वेळेस काही ग्रामंस्थांनी कोपरगाव पोलिस स्टेशनला भ्रमनध्वनी करुन माहीतीही दिली होती माञ कुठलीच कारवाई झाली नाही उलट भ्रमणध्वनी करणाऱ्यांचे नाव गोपनीय  न ठेवता अवैद्य दारु धंदे वाल्यांना सांगण्यात आले   ग्रामपंचायतनेही दारु बंदी विषयी पावले उचलली होती  तसा ठराव ही केला होता माञ काहींचे हीत संबंध आड आल्याने दारु बंदी होऊ शकली नाही येत्या आठ दिवसात काही कारवाई न झाल्यास   तेच तरुण गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख व उत्पादन शुक्ल विभागाला लेखी निवेदन देणार असुन अवैद्य दारु विक्री करणाऱ्यां विरुध्द कठोर भुमिका घेणार आहे