Breaking News

कोरोना बाधित तो व्यक्ती टाकळी ढोकेश्वरचा नसून सुपा पोलिस स्टेशनचा कर्मचारी आरोग्य विभागाचा खुलासा !

कोरोना बाधित व्यक्ती टाकळी ढोकेश्वरचा नसून  सुपा पोलिस स्टेशनचा कर्मचारी आरोग्य विभागाचा खुलासा !
पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यात दि 27 जुलै रोजी शासकीय लॅब च्या अहवालानुसार टाकळी ढोकेश्वर येथील 35 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळला असल्याचे निष्पन्न झाली होते. परंतु त्या व्यक्तीचा पत्ता हा चुकून टाकळीढोकेश्वर झाला होता  मात्र तो मूळचा येळपणे तालुका श्रीगोंदा येथील आहे. मात्र सध्या सुपा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत आहे त्यामुळे हा व्यक्ती टाकळी ढोकेश्वर चा नसून सुपा पोलिस स्टेशनचा कर्मचारी असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.
या व्यक्तीने कोरोना चाचणी साठी स्राव पारनेर कोविड केअर सेंटर मध्ये दिला होता त्यानुसार त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.