Breaking News

आ. काळे नी घेतली कृषी सेवा केंद्र चालकाची बैठक !


आ. काळे नी घेतली कृषी सेवा केंद्र चालकाची बैठक !
करंजी/प्रतिनिधी :
आज शेतकऱ्यांची पिके जोमात असतांना पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने पिकांवर अमाप पैसा खर्च करून बसला असल्याने शेतकरी चिंतेने ग्रासला गेला आहे त्यातच भर म्हणून की काय अपुऱ्या प्रमाणात मिळणाऱ्या युरिया व खतामुळे पिके कोमेजून चाललीय आहे. या संदर्भात आज कोपरगाव येथे आमदार आशुतोष दादा काळे यांनी बैठक घेतली.
 या बैठकीस तालुका कृषी अधिकारी श्री अशोक आढाव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. वाघिरे, श्री. सोनवणे, श्री आबासाहेब भोकरे, श्री राजेश ठोळे तसेच कोपरगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व मालक उपस्थित होते.
   या वेळी आ काळे यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यातील  शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून योग्य त्या खबरदारी घेण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांना खते खरेदी करतांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच युरिया चा साठेबाजार होणार नाही आणि मुबलक प्रमाणात युरिया तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी मी स्वतः शासन दरबारी  प्रयत्न करेल असेही आश्वासन या वेळी आ काळे यांनी अधिकारी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना दिले आहे.आ काळे च्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनच्या अशा पल्लवित झाल्या आहे.