Breaking News

भंडारद-यात रविवार पासुन वृत्तपत्र विक्री सेवा बंद, वृत्तपत्र विक्रेत्याचा निर्णय

राजूर/प्रतिनिधी :
    अकोले तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भंडारादरा या ठिकाणी वृत्तपत्रांची उद्यापासून सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वृत्तपत्र विक्रेते रामेश्वर अवसरकर यांनी दिली आहे.
     शेंडी ( भंडारदरा) या ठिकाणी ज्ञानेश्वर अवसरक हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासुन वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पंरतु कोरोना या विषाणु जन्य आजाराने थैमान घातल्यानंतर भारत सरकारने लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे त्याचा परीणाम वाहतुक व्यवस्थेवरही झाला असुन अकोले येथुन भंडारादरा येथे वृत्तपत्र आणण्यास अनंत अडचणी निर्माण झाल्या. तरीही या परीसरातील नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून या वृतपत्र विक्रेत्याने खाजगी वाहतुकीचा आधार घेत वृत्तपत्र भंडारादरा येथे कशी पोहचतील याची काळजी घेतली. भंडारदरा येथील वृत्तपत्र विक्रेते रामेश्वर अवसरकर हे जादा दराने वृत्तपत्र विकत असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याने आपण जादा पैसे देऊन वृत्त पत्र आणुन ते विकत असुन गाडीचे भाडे वसुल करण्यासाठी पेपरचा एक रुपया जादा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या मेसेजमुळे आपण नाराज झालो असुन लॉकडाऊन उघडल्यानंतर वाहतुक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर पुढील विचार करु असेही त्यांनी सांगितले.