Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात नव्याने सात पॉझिटीव्ह तालुक्याचा आकडा साठवर ; कोळगाव व घारगावकरांची चिंता वाढली !

श्रीगोंदा तालुक्यात नव्याने सात पॉझिटीव्ह तालुक्याचा आकडा साठवर ; कोळगाव व घारगावकरांची चिंता वाढली !
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी :
  दि. 19 तालुक्यातील कोरोना विषाणूचे संकट अधिकच गडद होत आहे.
पंचायत समितीमधील निगेटिव्ह रिपोर्ट दिलासा देणारे असतानाच आता तालुक्यात नव्याने सात रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर माहिती देताना म्हणाले, घारगाव येथे 4 नवे रुग्ण मिळाले.
तर चांडगाव व देवदैठण येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोळगाव येथे नवा रुग्ण मिळाला आहे. 
दरम्यान कोळगावकरांनी जास्त सावध होण्याची गरज असून आज कोरोना पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा मागील रुग्णांच्या संपर्कातील नसल्याने तेथे कोरोना पाय पसरत असल्याची भीती प्रशासन व्यक्त करीत आहे.
दरम्यान काल सापडलेल्या नव्या सात रुग्णात तीन महिला आहेत. तालुक्याचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आता साठ झाला असल्याने काळजी वाढली आहे.