Breaking News

दुध आनुदानासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन !

दुध आनुदानासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
- दूध उत्पादक शेतक-यांना प्रतिलिटर 10 रूपये अनुदान दयावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रूपये अनुदान आणि दूधाला किमान 30 रूपये दर दयावा या मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदार संघातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर  भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात जनता आर्थिक विवंचनेत असतांना राज्य सरकारने त्यांना काहीच मदत केली नसून राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दूधाला सरसकट प्रति लिटर 5 रूपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीला अनुदान दिले गेले, आता दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावले आहे. राज्यातील नाकर्ते सरकारने दुध उत्पादक शेतक-यांनाही वा-यावर सोडून दिले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने 21 जुलौला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन 1 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्यायाविरोधात एल्गार करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून यांच दिवशी दुध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर अहिंसक पध्दतीने महाएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. 
महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतक-यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाबरोबरच दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे.
    दूधाला प्रती लिटर 10 रूपये अनुदान, दूध भुकटी करिता प्रती किलो 50 रूपये अनुदान, शासनाकडून 30 रूपये प्रती लिटरने दूधाची खरेदी या न्याय्य मागणीकरिता सर्व शेतकरी 1 ऑगष्ट २०२० रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन होणार असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोेल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक दूध संकलन केंद्रावर आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रोहोम यांनी दिली आहे