Breaking News

देसवडे येथे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद.!

देसवडे येथे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद.!
पारनेर प्रतिनिधी - 
  पारनेर तालुक्यातील देसवडे येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद केले आहे  बिबट्या  देसवडे येथील शेतकरी भाऊसाहेब रेवजी दरेकर यांच्या ५१९ गट नंबर मध्ये व संजय नाना भोर या शेतकऱ्यांच्या घरापासून २०० फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यामध्ये  बिबट्या जेरबंद झाला आहे.
   या बिबट्याने काही दिवसापूर्वी बाबासाहेब तुळशीराम वाडेकर यांची एक शेळी नेली असून येथे असल्याची माहिती समजते तर येथे अजून दोन बिबट्या असण्याची शक्यता आहे असे येथील शेतकरी सांगत आहेत दि. 16 जुलै रोजी संपत टेकुडे या शेतकऱ्याच्या बिबट्याने तीन मेंढ्यांना गळ्याला चावा घेतल्याने त्या मृत्युमुखी पडल्या तर एक मेंढी बिबट्या घेऊन गेला होता बरेच दिवसापासून बिबट्या या परिसरामध्ये वावरत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे परिसरात  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही दोन बिबट्या येथे असल्याने त्यांना त्वरित पिंजरा लावून पकडावे तसे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
    वनविभागाने दुर्लक्ष केल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देसवडे गावचे व्हा. चेअरमन संजय भोर यांनी वन विभाग प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
   दरम्यान बिबट्याला वडगाव सावताळ येथील रोपवाटिके येथे आणून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई वन विभाग करणार आहे सहाय्यक वनसंरक्षक देवखेळे, जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साहेबराव भालेकर, वनरक्षक तोरंगे,वनमजुर थोरात, जाधव,गाढवे हे यावेळी उपस्थित होते.