Breaking News

नेवासा तालुक्यात दोन दिवसात ५६ रुग्णांची वाढ !

नेवासा तालुक्यात दोन दिवसात ५६ रुग्णांची वाढ ! १७९ एकुण रुग्ण तर १०० रुग्गांची कोरोनावर मात ! एकाचा मृत्यु तर ७४ रुग्णांवर उपचार सुरु !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये नव्या ५६ रुग्णांची वाढ झालेली आहे तर गुरुवार (दि ३०) रोजी सांयकाळी तालूका आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात आता पर्यंत १७९ रुग्ण संख्या संख्या झालेली आहे त्यापैकी १०० रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असून घोडेगांव येथील एका ७३ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे कोरोना बाधित मृतांची संख्या तालूक्यात पाच इतकी झाली आहे.
  तर ७४ रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत.यामध्ये एक पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी,वैद्यकिय अधिकारी,दोन राजकिय महीला कोरोनाशी झुंज देत असून तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी जनतेला दक्षता पाळण्याचे आवाहन करुन आरोग्य विभाग मोठा सतर्क केला आहे. नेवासा कारागृहातील २१ आरोपी,पाच पोलिस कर्मचारीही बाधीत झालेले आसल्यामुळे आरोपींना कोरोनाचा उपचार कसा व कोठे करावा असा प्रश्न पोलिस अधिकाऱ्यांना पडला आहे.याबाबत उशीरा पर्यंत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरु असून विचारमंथन सुरु होते.जर आरोपींना कोविड केंद्रात उपचारासाठी ठेवले तर त्यांच्यावर बंदोबस्त कसा ठेवायचा अन् योगायोगाने म्हणा अगर दुर्देवाने म्हणा नेवासा पोलिस ठाण्यातील पाच पेलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने आरोपी व पोलिस यांच्यावर कसे व कुठे उपचार करायचा यावर मोठा कथ्याकुट करण्यात आले.
    नेवासा शहरासह तालूक्यात कोरोना या संसर्ग आजाराने मोठे थैमान घातले आहे संसर्गाची साथ सोडण्यासाठी सुरक्षितता पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यादृष्टीने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यासाठी आरोग्य विभाग मोठा सतर्क झालेला आहे.