Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात एकूण ७८ रुग्ण, एकाच दिवशी १३ पाॅझिटिव्ह; काष्टी, चिखलठाणवाडीत नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली !

श्रीगोंदा तालुक्यात एकूण ७८ रुग्ण, एकाच दिवशी १३ पाॅझिटिव्ह; काष्टी, चिखलठाणवाडीत नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली !
------
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी :
     तालुक्यात काष्टी येथे कोरोनाची एन्ट्री  झाल्याने धोका वाढला आहे. चिखलठाणवाडी येथेही नवा रुग्ण आढळला आहे. तसेच घारगाव, घोगरगाव, देवदैठण, कोळगाव, चांडगाव या ठिकाणी जुन्या रुग्णांच्या घरातील लोक कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी दिलेल्या माहितीनूसार काल सोमवारी तालुक्यात १३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्याचा कोरोना बाधित व्यक्तींचा एकुण आकडा ७८ वर गेल्याचे त्यांनी सांगितले. काल सापडलेले रुग्ण आणि गावे घोगरगाव -४, देवदैठण- ३, घारगाव-२, काष्टी-१ , कोळगाव- १, चिखलठाणवाडी-१ व चांडगाव- १. असा समावेश आहे. यात ७ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. काष्टी येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने अडचणी निर्माण होवू शकतात. कारण काष्टी हे पुणे जिल्ह्याला जवळ असणारे व तालुक्यातील अनेकांचा वावर असणारे गाव आहे.