Breaking News

वाघोली परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला - युवा नेते उमेश भालसिंग

वाघोली परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला - युवा नेते उमेश भालसिंग 
शेवगाव तालुका प्रतिनिधी :
शेवगाव तालुक्यातील वाघोली व परिसरातील गावात काल दिनांक २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली असून त्यात तुर कापूस बाजरी सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे पुर्ण खरिप वायला गेलेले आहे. शेवगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी असले तरी ढोरजळगाव मंडळात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे.त्यामुळे वाघोली गावातील रस्तेही मोठ्या प्रमाणावर वाहून गेले रस्त्यांवर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये वाघोली येथील मीर वाट ,वाघोली-माका रस्ता,वाघोली-शिंगवे रस्ता, वाघोली-दातीर वस्ती रस्ता तसेच सानटवस्ती रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होऊन काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत,क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेल्या वाघोली गावामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून  रस्त्यांची मागणी दुर्लक्षित आहे.तरी खासदार डॉ सुजय दादा विखे व आमदार मोनिकताई राजळे यांनी त्वरीत लक्ष खालून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत वाघोली ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात लोकप्रतिनिधींना मताधिक्य दिले आहे.तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच आमदार,खासदार व सत्ताधाऱ्यांनी या रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करावे नुकसानग्रस्त खरीप पिकांची योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी.अशी मागणी वाघोली गावचे युवा नेते उमेश भालसिंग सरपंच बाबासाहेब गाडगे दादासाहेब जगदाळे सर, सुभाष दातीर किशोर शेळके सोपान पवार शरद पवार योगेश भालसिंग बाळासाहेब भालसिंग संदीप शेळके अशोक ढाणे या शेतकऱ्यांनी केली आहे.