Breaking News

बोकनकवाडी च्या तरुणाचा वडगाव सावताळ मध्ये झालेला मृत्यू अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय बळावला.

बोकनकवाडी च्या तरुणाचा वडगाव सावताळ मध्ये झालेला मृत्यू अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय बळावला. 
त्या तरुणाचा खून झाला असण्याची शक्यता
पाच जणांकडे पोलिसांची चौकशी 
पारनेर/प्रतिनिधी - 
तालुक्यातील वासुंदे येथील बोकनकवाडी तरुण अजित रावसाहेब मदने हा २२ वर्षीय तालुक्यातील वडगावसावताळ - गादजीपुर च्या वन विभागाच्या जंगलात  मृतावस्थेत आढळून आला काल दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे त्यातूनच हा अनैतिक संबंधातून खून झाला असल्याची माहिती समोर येत आहे मात्र शवविच्छेदना च्या अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल त्यानंतरच गुन्ह्याची नोंद केली जाईल.
मयत तरूणाच्या नातेवाईकांनी घेतलेल्या संशयावरून हा तपास सुरू आहेत.
त्या तरुणाचा मृत्यू बाबत संशयित पाच जणांकडे चौकशी सुरू आहे आज दुपारपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.