Breaking News

पारनेर शिवसेनेमध्ये भाऊ कोरगावकर यांनी समन्वय साधला ?

पारनेर शिवसेनेमध्ये भाऊ कोरगावकर यांनी समन्वय साधला ?
गेलेल्या नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना भाऊ कोरगावकर यांनी एकत्रित आणले का ?
माजी आमदार विजय औटी यांनी बैठकीकडे फिरवली पाठ !
पारनेर मध्ये महाविकास आघाडीत समन्वय साधला जाणार का ?
नगरसेवक म्हणतात स्थानिक राजकारण नाहीतर पाणीप्रश्न महत्वाचा !
औटी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज मात्र मतोश्रीचा आदेश पाळणारे आम्ही !
शशिकांत भालेकर : पारनेर/तालुका प्रतिनिधी - 
       पारनेर तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यांत शहरातील नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना पारनेरमध्ये संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या मध्यस्थीने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत समन्वय घडवून आणावा असे सांगितले गेले जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी पारनेरमध्ये समन्वय बैठकीचे आयोजन केले मात्र ही बैठक घ्यायची कुठे यावरच एकमत होत नव्हते अखेर शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्याचे ठरले मात्र त्या बैठकीआधी माजी आमदार विजय औटी यांची संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली व तेथे दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली त्यानंतर नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात विश्रामगृहामध्ये बैठक घेण्यात आली मात्र त्याठिकाणी नगरसेवक उशिरा दाखल झाले तसेच आमदार निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयात असल्याची माहिती भाऊ कोरगावरांना मिळाली त्यानुसार त्यांनी आमदार निलेश लंके यांना फोन करून विश्रामगृहावर बोलवले त्या ठिकाणी आमदार निलेश लंके हे नगरसेवका सह उपस्थित झाले त्यानंतर निलेश लंके व भाऊ कोरगावकर यांच्यात काही मिनिटे चर्चा झाली व निलेश लंके तेथून निघून गेले त्यानंतर शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित झाले मात्र या बैठकीमध्ये जास्त काही विषयावर चर्चा न होता आलेल्या शिवसैनिकांना पुन्हा सामावून घेतलं पाहिजे सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे अशा सूचना भाऊ कोरेगावकर यांनी दिल्या व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले त्यानुसार भाऊ कोरगावकर वाढदिवस प्रसंगी पुन्हा पारनेर मध्ये येणार आहेत व एवढ्यावर ही बैठक उरकती घेतली मात्र बैठकीमध्ये मनोमिलन झाले का प्रश्नअनुत्तरित राहिला ज्या स्थानिक नेतृत्व नाराज होऊन हे नगरसेवक राष्ट्रवादी दाखल झाली होते ते परतल्यानंतर तालुक्यातील स्थानिक नेतृत्व माजी आमदार विजय औटी या बैठकीला उपस्थित राहणे क्रमप्राप्त होतं मात्र ते या बैठकीकडे फिरकले देखील नाही त्यामुळे नगरसेवक व त्यांच्यातील वाद हा विषय तूर्त तरी मिटला असे म्हणता येणार नाही संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सेनेचे पदाधिकारी व पाच नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय घडून आणला मात्र तो कितपत टिकेल येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तूर्त तरी पारनेर मध्ये घेतलेली संपर्कप्रमुखानीं घेतलेली बैठक ही एक औपचारिकताच दिसून आली.
    पारनेर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसत आहे विश्रामगृहावर ठेवण्यात आलेली बैठक यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत सामावून घेऊन एकदिलाने काम करावे अश्या सूचना दिल्या मात्र या बैठकीला आजी माजी आमदार हे समोरा समोर आलेच नाही त्यामुळे त्यांच्यात बिघाडी'ही कायमच राहिली मात्र त्या नगरसेवकांना सेनेत मध्ये सामावून घेतले आहे का असा सवाल अनुत्तरीत राहिला तर दुसरीकडे ते नगरसेवक स्थानिक नेतृत्वावर अद्यापही नाराज असल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे हे यावरून दिसून येत आहे मात्र शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व नगरसेवक यांच्यामध्ये कोणताही वाद नाही हे भाऊ कोरगावकर यांच्यासमोर झालेल्या चर्चेवरून स्पष्ट झाले त्या नगरसेवकांचा रोष फक्‍त माजी आमदार विजय औटी यांच्यावरच आहे.

 पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मी  नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांचे स्थानिक पातळीवरील मनोमिलन करण्यासाठी आलेलो आहे. शिवसेनेचे ते नगरसेवक व शिवसैनिक यांच्यात मेळ जमला पाहिजे, तसेच पारनेरमध्ये शिवसेना प्रबळपणे तशीच उभी राहिली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे असे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले

 संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले आहे का अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तालुक्यात उलट-सुलट चर्चा रंगल्या त्यामुळे भाऊ कोरगावकर हेदेखील नाराज झाले त्यामुळे त्यांनी शिवसेना कोणाच्याही दावणीला बांधली जाणार नाही असे खडसावून सांगितले आहे

 शिवसेनेमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र दोन गटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठक पार पडली त्यामुळे समन्वय साधला गेला का मुख्य सवाल उपस्थित होत आहे
----------------------------------- 

शिवसेनेत प्रवेश केलेला आहे पक्ष देईल ती जबाबदारी यापुढे पार पाडू स्थानिक पातळीवर संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाऊ कोरगावकर यांच्याकडे समन्वयक म्हणून जिम्मेदारी दिलेली आहे माजी आमदार विजय औटी यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज होतो
मातोश्रीचा आदेश पाळणारे आम्ही आहोत.
----------
किसन गंधाडे 
नगरसेवक पारनेर

स्थानिक राजकारणाशी आम्हाला देणेघेणे नाही आम्हाला शहराचा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे उद्धव साहेबांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्याची पूर्तता करून देण्यासाठी आठ दिवसांमध्ये सर्वे सुरू करणार आहोत आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आम्ही तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहोत स्थानिक नेतृत्व  वाद होऊ नये म्हणून समन्वय बैठक घेतली गेली मात्र आमचा स्थानिक कोणाशी वाद नाही पाणीप्रश्न आमचा मुद्दा होता मात्र माजी आमदार विजय औटी त्याबाबत सकारात्मक नव्हते म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात तो सोडविण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत गेलो होतो मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो मार्गी लावणे बाबत शब्द दिला आहे.
--------
डॉ. मुदस्सीर सय्यद,
 नगरसेवक. पारनेर