Breaking News

संगमनेर तालुक्यात अवघ्या काही तासात ३० कोरोना पॉझिटिव्हरॅपिड अँटीजेन चाचणीतून मिळाले २४ नवे रुग्ण !

संगमनेर तालुक्यात अवघ्या काही तासात ३० कोरोना पॉझिटिव्ह
रॅपिड अँटीजेन चाचणीतून मिळाले २४ नवे रुग्ण 

संगमनेर/प्रतिनिधी :
     संगमनेर तालुक्यात अवघ्या काही तासात तब्बल ३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले असल्याचे समोर आले आहे. संशयीत रुग्णांची जास्तीत जास्त प्रमाणावर चाचण्या करून त्यातील कोरोना बाधितांवर उपचार सुरु करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन प्रणालीतून  आज (सोमवार दि.२०) चोवीस रुग्ण कोरोना बाधित रुग्ण असल्याचा अहवाल आला आहे. त्याचबरोबर काही खाजगी आणि शासकीय अहवालातून इतर सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव आले आहेत. आज मिळून आलेल्या एकूण तीस कोरोना पॉझिटिव रुग्णांपैकी तेरा रुग्ण संगमनेर शहरातील असून उर्वरित तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांतील आहेत. यासह संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत ३९० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.