Breaking News

कोरोना आज परत कोपरगाव शहरात !

कोरोना आज परत कोपरगाव शहरात
करंजी प्रतिनिधी- 
काल कोपरगाव शहरातील एक ५८ वर्षीय डॉ कोरोना आढळून आल्याने प्रशासनाने त्यांचा संपर्कातील लोकांना ताब्यात घेतले असता आज त्यांचा संपर्कातील कोपरगाव साईनगर या भागातील एक ४० वर्षीय इसम कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   त्यामुळे आता कोपरगाव तालुक्यातील कोरोना  ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आता २३ झाली असून १२ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले असून ,कोपरगाव शहरातील एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. त्या मुळे कोपरगाव व परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेत प्रशासनाचे नियम व अटी पाळणे गरजेचे आहे.