Breaking News

तांदूळ घेण्यासाठी आले आणि २७ हजार रुपयाचा मोबाईल घेऊन पळाले !


तादूंळ घेण्यासाठी आले.अन् किराणा दुकानदाराचा २७ हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल घेऊन पसार झाले.
-----------
चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद .
-------
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील घटना !
  -------
  उक्कलगाव/प्रतिनिधी :
     कोल्हारहून अज्ञात दोन चोरटे मोटारसायकल वरून उक्कलगाव येथील शाळेच्या गेटवर समोर असणार्‍या पप्पू किराणा दुकानात आले असता 
   त्यांनी किराणा दुकानदाराला तांदुळाची मागणी केली तेवढ्यात तांदुळ देण्याच्या बहाण्यात अज्ञात चोरट्यांनी कपाटातून २७ हजारचा रूपयांचा विवो कंपनीचा  मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हात चलाखीने लांबविला अज्ञात चोरटे  हिंदी भाषेत बोलत होते किराणा दुकानदाराला त्यांची भाषा समजली नाहीत काहीवेळानंतरच ते अज्ञात दोघे चोरटे शाईन मोटारसायकलवरून किराणा माल न घेताच येथून बेलापूर दिशेने पसार झाले त्यांनतर दोघां चोरटयांचा त्या किराणा दुकानदाराला संशय आला.
     किराणा दुकानदारने लगेच कपाटात ठेवला मोबाईल पाहीला असता मोबाईल चोरट्याने लांबविला असल्याचे समजले त्या किराणा दुकानदाराला दुकानाबाहेर येऊ पर्यत ते दोघेही दुकानापासून पसार झाले होते चोरी झाल्याची कळताच नागरिकांनी गर्दी झाली होती त्यांनी लगेच शाळेच्या गेटवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पाहीले असता त्यात दोन अज्ञात विनानंबरच्या शाईन मोटारसायकल वरून आल्याचे दिसत होते पंरतू कॅमेर्‍यात दोघेही अस्पष्ट दिसत होते याप्रकरणी घडलेल्या चोरीची झाल्याची 
तक्रारीची माहिती बेलापूर पोलिसांना सुहास बाबुराव फुलपगार (रा.उक्कलगाव ता श्रीरामपूर )यांनी पोलिसांना फिर्याद दिली सदरचा घडलेला चोरीचा झाल्याचा प्रकार (दि ७) मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भरदिवसा उक्कलगाव येथे घडला. 
       याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निखिल तमनर अधिक तपास करीत आहे.