Breaking News

तालुक्यात काष्टी गाव संपूर्ण लॉकडाऊन सापडला पहिला रुग्ण; राजकीय नेत्यांशी संपर्क आल्याची तालुक्यात चर्चा !

तालुक्यात काष्टी गाव संपूर्ण लॉकडाऊन सापडला पहिला रुग्ण; राजकीय नेत्यांशी संपर्क आल्याची तालुक्यात चर्चा !
 श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
     श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे बाजारपेठेचे गाव म्हणून काष्टी गावची ओळख असताना गेली पाच महिन्यापासून ग्रामपंचायतीने कोरोना संसर्गजन्य आजाराची गावात लागन होवू नये म्हणून खूप मोठी काळजी घेतली परंतु काल गावात एक कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आणि प्रशासकीय पातळीवर याची दखल घेऊन काष्टी गावठाण प्रतिबंधात्मक क्षेत्र  घोषित  करुण आज दि.२१ रोजी दुपारी १२ पासुन ते दि.२७ जुलै २०२० दुपारी १२ पर्यंत सात दिवस संपूर्ण  गाव बंदचे श्रीगोंदा तहसिलदार महेंद्र माळी यांनी आदेश दिले असुन पुढील उपाययोजनासाठी तहसिलदार माळी यांनी सहनियंत्रण अधिकारी राम जगताप, विस्तार अधिकारी सुजित भोंग, वैद्यकीय अधिकारी कल्याण धुमाळ, मंडल अधिकारी भारत चौधरी,कामगार तलाठी  अतुल सुपेकर, ग्रामसेवक शिवाजी वाहुरवाघ याची गावात नियुक्ती करण्यात आली आहे. सात दिवस सापडलेल्या कोरोना रुग्ण त्याचे व्यवसायिक ठिकाण  राहाण्याचे ठिकाण या ठिकाणी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. गावात कोणत्याही  प्रकारची वाहने दुकाने, इतर व्यवसाय बंद राहतील गावात आत बाहेर जाण्याचे मार्ग पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या पथकाने बंद केले असुन फक्त अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळून सर्व  बंद  राहिल सापडलेला रुग्ण आणखी किती लोकांच्या संपर्कात आला आहे. याची तपासणी  चालु आहे जे व्यक्ती सदर कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली विशेषतः काळजी घेऊन स्वतः आपल्याच घरी होम कारन्टाईन होणे इतरांच्या  संपर्कात येवून नये असा सल्ला   तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी सांगितले आहे.