Breaking News

दुधाला योग्य भाव न मिळाल्यास दुधाचे टँकर फोडू-नितीन दिनकर यांचा इशारा

दुधाच्या भाववाढीसाठी नेवासा येथे भाजपचे आंदोलन

दुधाला योग्य भाव न मिळाल्यास दुधाचे टँकर फोडू-नितीन दिनकर यांचा इशारा
नेवासा तालुका प्रतिनिधी -
दुधाच्या भाववाढीसाठी भाजपच्या वतीने नेवासा येथे आंदोलन करण्यात आले.माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.राज्य शासनाने शेतकऱ्यांचा दुधाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय द्यावा दुधाला योग्य भाव न मिळाल्यास दुधाचे टँकर अडवून ते  टँकर फोडू असा ईशारा भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी बोलताना दिला.तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा असल्याने दुधाच्या भाव वाढीबाबत शासन उदासीन असल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केली.
     बुधवारी सकाळी ११.३० वाजता  नेवासा येथील खोलेश्वर गणेश मंदिर चौकात शेतकऱ्यांच्या  दुधाला शासनाने योग्य भाव द्यावा म्हणून आंदोलनास प्रारंभ झाला.तोंडावर मुखपट्टी बांधून सामाजिक अंतराचे पालन करत हे आंदोलन झाले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणा देत शेतीला जोडधंदा असलेल्या  शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे अशा 
घोषणा देत रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले त्यानंतर नेवासा येथील तहसील कचेरीवर चालत जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले येथे ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसीलच्या प्रांगणात दूध ओतले.
    या दुधाच्या भाववाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी बोलतांना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की शासनाने शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुधाला किमान पस्तीस रुपये हमी भाव व प्रती लिटरला दहा रुपये अनुदान दिले पाहिजे,दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे असे सांगून आज शासनाकडे याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे सांगून दुधाच्या भाव वाढीबाबत शासन उदासीन असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.
    यावेळी बोलतांना भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर म्हणाले की दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान व भुकटी ला पन्नास रुपये अनुदान मिळावे ही आमची मागणी आहे आज शेतकरी स्व:तच्या लेकरांपेक्षा ही जास्त जीव जीव आपल्या गाई म्हशींना लावत असून संकटात ही पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे असतांना दुधाला सोळा रुपये लिटर असा भाव मात्र पाण्याच्या बाटलीला वीस रुपये भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी बिकट परिस्थिती दुध उत्पादक शेतकऱ्यांनावर आली आहे शासनाने याबाबत गांभीर्याने भूमिका घेत दुधाला मागणीप्रमाणे भाव वाढवून द्यावा याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास नेवासा तालुक्यातुन एक ही दुधाचा टँकर बाहेर जाऊ दिला जाणार नाही आम्ही दुधाचे टँकर अडवून ते फोडू असा ईशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
    यावेळी उदयकुमार बल्लाळ, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. लक्ष्मणराव खंडाळे,ज्ञानेश्वर टेकाळे,भास्कर कणगरे, भाजप गटनेते नगरसेवक सचिन नागपुरे,राजेंद्र मापारी, भारत डोकडे,युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार,भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे,माजी सरपंच सतीश गायके,आकाश देशमुख, प्रतीक शेजुळ,दत्तात्रय वरुडे,रमेश घोरपडे, आदिनाथ पटारे,विवेक नन्नवरे,दत्तात्रय गीते, सोपान डौले,सतीश डौले उपस्थित होते.