Breaking News

शिरापुर येथील महिला व सुपा येथील पोलीस चौकी परिसरातील व्यक्ती कोरोना बाधित !

शिरापुर येथील महिला व सुपा येथील पोलीस चौकी परिसरातील व्यक्ती  कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यांमध्ये शिरापूर येथील एक महिला व सुपा पोलिस चौकी शेजारील परिसरातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांला कोरोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे 
   शिरापूर येथील महिलेचा पती कौठे यमाई येथे कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे ती महिला शिरापूर येथे माहेरी आली त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली तो अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
     सुपा पोलिस स्टेशन जवळील एका कंपनीतील कर्मचाऱ्याला कोरोना ची बाधा झाली आहे हा कर्मचारी सारोळा कासार तालुका नगर येथील आहे हा व्यक्ती कंपनीत काम करत होता त्यामुळे ही कंपनी पूर्ण निर्जंतुकीकरण करून त्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.