Breaking News

लॉकडाऊन वाढवू नका, उपासमारीने माणसे मरतील!

- प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई /प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा होऊ नका. भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोनाने नाही, पण रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीने माणसे मरतील, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आपण कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणू' असे 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे, विनंतीष्ठ खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मीही त्यावेळेस भ्यायलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असे अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने सांगितले. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितले की, भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ओस्ट्रेलिया जिंकत आहे, असे दिसते, असे आंबेडकर म्हणाले. कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसे जन्माला आली, की त्यांचे मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावे. तरच माणसे जगतील, नाहीतर उपासमारीने माणसे मरतील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.