Breaking News

राहुरी तालुक्यातअपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणीत भेदभाव !राहुरी तालुक्यातअपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणीत भेदभाव !

देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
                      देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत कोरोना बाधीत 15 रुग्ण सापडले आहेत. तरी ही देवळालीकरांना कोरोना बाबत  भिती वाटत नाही. नगर पालिका प्रशासन मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना कडून दंड अकारणी करतात परंतू काही नागरीक दंड भरण्यास तयार नाहीत. दंड अकारणीच्या वेळी नगर पालिका कामगारांना पोलिस प्रशासना कडून सहकार्य मिळत नाही. राज्यमंञ्याच्या तालुक्यात पोलिसाकडून भेदभाव केला जात आहे. राहुरीत मास्क न वापरणाऱ्या नागरीकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.तर देवळाली प्रवरात माञ गुन्हे दाखल करण्यास असमर्थता दाखविली जात आहे.
                    देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत कोरोनाचा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुख्याधिकारी अजित निकत यांनी शहरात येणारे सर्व रस्त्यांवर नाकेबंदी  करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरचा कोणताही व्यक्ती शहरात आला तरी त्यास क्वारंटाईन झाल्या शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे संसर्गजन्य आजार रोखण्यात यश मिळविले होते.त्यावेळी लाँकडाऊन काळात भाऊबंदकीचे राजकारण झाले.उत्साही नगराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा व नगर पालिका कामगारांचा हिरमोड झाला. देवळाली प्रवरात  रस्त्यावरील नाकेबंदी उठविण्यात आली.त्यानंतर माञ शहरातून गावात आलेले ठराविकच व्यक्ती क्वारंटाईन होत होते. त्यावेळी पोलिस प्रशासनाचे पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य  मिळाले नव्हते. आज हि पोलिस नगर पालिकेस सहकार्य करीत नसल्याचे जाणवत आहे मास्क विरोधात कारवाई  करण्यासाठी   नगर पालिकेने पोलिसांना अनेक पञव्यवहार करुन ही सहकार्य मिळाले नाही .त्यामुळे देवळाली प्रवरातील नागरीक कोराना घाबरत नाही. सायंकाळी 5 वाजे नंतर संचार बंदी असतानाही चौका चौकात घोळके करुन तरुण वर्ग  संचारबंदीचे उल्लंघन करताना पोलिसांना दिसत असतानाही पोलिस पोलिसाचा धाक दाखवण्याची तसदी घेत नाही.
               राज्यमंञ्याच्या तालुक्यातच  पोलिस भेदभाव करत आहेत. राहुरी शहरातील नगर पालिका राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात आहे.तेथे आजही विना मास्क फिरताना आढळणाऱ्या नागरीकांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. सायंकाळी 5 नंतर फिरणाऱ्या नागरीकांवर सुद्धा कारवाई केली जात आहे.  देवळाली प्रवरात माञ नागरीकांना मोकळे राण मिळत आहे. नगर पालिका कामगार विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीं विरोधात दंड अकारणी करण्यात येते परंतू नागरीक माञ उलट कामगारांना दमबाजी करताना दिसतात. दंड अकारणी करताना पोलिस उपस्थित असल्यास  नागरीक दंड भरण्यास कुचराई करणार नाही. परंतू पोलिस सहकार्य करत नाहीत.राहुरी प्रमाणे देवळाली प्रवरात  मास्क व संचारबंदी बाबत नागरीकांवर कारवाई केल्यास नागरीकांना सवय लागेल. त्याच बरोबर संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होईल . 
               देवळाली प्रवरात आलेला कोरोणा पाहुणा म्हणून आलेला आहे. राहुरी तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या संपर्कात आल्याने  राहुरी कारखाना येथील तिघे, तर शेटेवाडी भागातील एक  व्यक्ती बाधित झाले होते.तर राहुरी येथील एका रुग्णालयात उपचार घेत असताना एका शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली होती .त्याच्या संपर्कात आल्याने त्याच्या कुटुंबातील तीन तर राहुरी कारखाना येथील दोघे  व  देवळाली  प्रवरा गणेगाव रोड लगत असलेल्या एका वस्तीवरील  दोघे, राहुरी कारखाना येथील एका व्यापाऱ्यावर नगर येथे खाजगी रुग्णालयात  उपचार  घेत असताना संपर्कात आलेल्या रुग्णामुळे बाधीत झाला. नाशिक येथील देवळाली कँम्प चे दोन व्यक्ती विद्यापीठात क्वारंटाईन असताना बाधीत आढळले असे एकुण 15 रुग्ण आढळले आहेत.रुग्णाची संख्या वाढू नये म्हणून नगर पालिका प्रयत्न करीत आहेच परंतू नगर पालिका कामगारांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. नागरीकांना सवय लावण्यासाठी राहुरी प्रमाणे देवळाली प्रवरात कारवाई केल्यास नागर पालिका कामगारांवरील ताण कमी होवून नागरीकांना सवय लागेल.