Breaking News

कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांवर!

- तब्बल 19 हजार 148 नवे रुग्ण

नवी दिल्ली/वृत्तसंस्था 
गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 19 हजार 148 नव्या रुग्णांनी नोंद करण्यात आली असून, त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने सहा लाखांचा आकडा पार केला आहे. तसेच, दिवसभरात 434 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेदिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 6 लाख 4 हजार 641 इतकी झाली आहे. तर, सध्या देशात 2 लाख 26 हजार 947 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 3 लाख 59 हजार 859 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 834 रुग्णांचा मृत्यू आला आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै पर्यंत एकूण 90 लाख 56 हजार 173 नमुने तपासले गेले आहेत. यापैकी 2 लाख 29 हजार 558 नमुन्यांची चाचणी बुधवारी करण्यात आली. गेल्या 12 दिवसांमध्ये देशात तब्बल 2 लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.