Breaking News

अकोले तालुक्यात कोरोनाने पन्नाशी ओलांडली !

 अकोले तालुक्यात कोरोनाने  पन्नाशी ओलांडली !
अकोले प्रतिनिधी :
अकोले  तालुक्यात आज  आणखी एका करोनाबाधीताची भर पडली आहे. तर आज सायंकाळी अकोले शहरातील आणखी टन तीन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ५४ झाली आहे. 

अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो व्यक्ती नाशिक ला जाऊन आल्याचे समजते. ग्रामीण रुग्णालयात येण्यापूर्वी आठ दिवस तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तसेच त्या रुग्णालयाचे डॉक्टरचे स्त्राव घेऊन तपासणी करण्यात येणार आहेत. 
 ही व्यक्ती काही नातेवाईकांच्या संपर्कात आल्याचे  समजते.त्यामुळे त्यांची ही माहिती घेतली जात आहे  
तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचे अर्धशतक पूर्ण .. झाले आहे अकोले,देवठाण  चास  येथील रुग्णानंतर  कळंब येथील ४२ वर्षीय पुरूष कोरोना बाधित आढळला आहे तालुक्यात आतापर्यत कोरोना बाधितांची संख्या ५१ झाली आहे  तर दोघांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे .अकोले 17 व्यक्तीमचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 14 जण

जणांचे  अहवाल निगेटिव्ह तर तीन जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहे यातील दोघे जण कारखाना रोड  वरील रहिवाशी आहे तर एक परखतपूर येथील रहिवाशी आहे  कारखाना रोड येथील एका पक्षाचा पदाधिकारी  पॉझिटिव्ह  आढळला आहे
  शहरातील रुग्णाच्या संपर्कातील काही अहवाल येणे अद्याप बाकी असल्याने  रुगणांची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे
-----------