Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने घेतला दुसरा बळी !

श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने घेतला दुसरा बळी
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
  श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होतो आहे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने तालुक्यासह प्रशासनाची चिंता वाढतच चालली असुन यातच काल तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील सुरतहुन आलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाशी लढतांना उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असताच आज दि 28 रोजी तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे सदर व्यक्ती ही नगर येथे उपचार घेत होती या व्यक्तीचे मागील काळात किडनीचेही ऑपरेशन झाल्याची माहीती समजते आहे. तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने दोन बळी गेल्यामुळे खळबळ उडाली असुन श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णसंख्या १४१ इतकी झाली आहे. सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ८८  जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे अशी माहिती डॉ नितीन खामकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.