Breaking News

मनसेच्या कोपरगाव आंदोलनाला यश !

मनसेच्या  कोपरगाव  आंदोलनाला यश.
करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव मनसे च्या वतीने काही महिन्यांपूर्वी शहराध्यक्ष श्री सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर व कोपरगाव बेट भागाला जोडणाऱ्या गोदावरी नदी वरील मौनगिरी सेतू या पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करावी असे आंदोलन करत निवेदन कोपरगाव नगरपालिकेला देण्यात आले होते, आज कोपरगाव नगरपालिकेने सदर पुलावर बॅरिकेट बसून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असल्याने मनसे च्या आंदोलनाला यश मिळाले आहे असे मनसे चे शहराध्यक्ष श्री सतीश काकडे यांनी सांगितले आहे.
   कोपरगाव शहरातून वाहत असलेल्या गोदावरी नदीला अनेकदा महापूर येऊन गेले आहे त्या महापुरात कोपरगाव शहर व बेट भागाला जोडणारा लहान पूल वाहून गेला होता, त्या नंतर या भागातील हजारो लोकांना सुमारे ३ ते ४ किलोमीटरवर अंतर पार करत कोपरगाव शहरात यावा लागत असे त्या मुळे त्यावेळचे तत्कालीन आमदार अशोकदादा काळे यांनी नवीन पुलाची मंजुरी घेत पूल बांधून या भागाला परत एकदा कोपरगाव शहराला जोडले होते व या पुलाचे मौनगिरी सेतू असे नामकरण केले आहे.परंतु या पुलावरून भरपूर प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते या मुळे या पुलास हानी होऊ शकते तसेच त्याला तडे जाऊन आयुष्य देखील कमी होऊ शकते म्हणून कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला काही महिन्यांपूर्वी या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी उपयोजना कराव्या अशा आशयाचे आंदोलन करत निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर काही दिवसातच कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत मौनगिरी सेतू वर बॅरिकेट्स बसविण्याचे काम सुरू देखील करण्यात आले होते परंतु कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ते काम बंद पडले होते त्यानंतर आज मनसे च्या पाठपुराव्याला यश येत  कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने मौनगिरी सेतू वर अजवड वाहनांना प्रवेश बंदी असे नमूद करत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्यास सुरुवात झाली असून त्या मुळे येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन अवजड वाहतूक पूर्ण पणे बंद होईल या मुळे मनसे च्या सामाजिक कामास यश मिळल्याचे समाधान वाटत आहे त्या मुळे कोपरगाव मनसे च्या वतीने नगराध्यक्ष श्री विजयराव वाहडणे, मुख्यधिकारी श्री प्रशांत सरोदे,श्री वाघ साहेब यांनी केलेल्या या कामाचे मोहनीराज नगर ,कोपरगाव बेट, के.जे.एस .काँलेज  तसेच नदीच्या पलीकडील सर्व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे असे श्री काकडे यांनी सांगितले.