Breaking News

नेवासा तालूक्यात रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात १० रुग्ण कोरोना बाधित तर दोन रुग्णांचा मृत्यु !

नेवासा तालूक्यात रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात १० रुग्ण कोरोना बाधित तर दोन रुग्णांचा मृत्यु ! 
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्ग आजाराच्या विळख्याने मोठा कहर केला असून रविवार (दि.२६) रोजी सायंकाळी आरोग्य खात्याला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये  १० रुग्ण बाधित झालेले असून दोन जणांचा कोरोनाच्या विळख्यात मृत्यु झाल्याचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
  नेवासा तालूक्यामध्ये रविवारी सांयकाळी एकूण कोरोना बाधितांचा आकडा १०८ वर पोहचला असून त्यापैकी ७८ रुग्ण बरे झाले आहेत तर २७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर नेवासा तालूक्यातील तीन मृत्यु मध्ये यापूर्वी  सोनईतील १ व आजच्या अहवालात कांगोणी येथील एक तर नेवासा शहरातील एकाचा मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. 
  नेवासा तालूक्यातील ग्रामिण भागात कोरोना संसर्ग आजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केलेली आसून प्रशासनाकडून कोरोनाला आळा बसविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ सुर्यवंशी यांनी दिली आहे.