Breaking News

लोणीमावळा ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न !


लोणीमावळा ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न !
निघोज/प्रतिनिधी :
जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजना व 14 व्या वित्तआयोगातून साकारलेल्या लोणीमावळा ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदिप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ पाटील हे होते.
        तसेच कार्यक्रम प्रसंगी पारनेर दूध संघाचे चेअरमन राहुल शिंदे पाटील,पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर,डॉ.श्रीकांत पठारे,सरपंच गणेश मापारी,उपसरपंच सुवर्णा शेंडकर,मा.सरपंच अशोक शेळके,विलास शेंडकर,चेअरमन डॉ.सुभाष मावळे,मा.चेअरमन कैलास गोरडे,संतोष शेंडकर,पाबळचे मा.सरपंच संदेशजी कापसे,सुप्याचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार,लोणीमावळा ग्रामपंचायत सदस्या सविता मावळे,नविता भंडारी,मनिषा पडवळ,आशाताई चासकर,व्हा.चेअरमन सुरमा मावळे,तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल लोणकर,ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब,महेश कोल्हे,शंकर शेंडकर,प्रविण शेंडकर,प्रविण लाळगे,रावसाहेब शेंडकर,संदिप हाडवळे,दिलीप शेंडकर,गोरख कापसे,संदीप कापसे,श्रीधर चासकर,राजेंद्र शेंडकर,स्वप्नील मावळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.