Breaking News

वचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज !

वचन राम राज्याचे, पण दिले गुंडाराज
- राहुल गांधींचा योगी सरकारवर निशाणा
नवी दिल्ली/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एका टोळक्याने भर रस्त्यावर गोळीबार करून पत्रकाराची हत्या केली. या प्रकरणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी ट्वीट करून योगी सरकार टीकास्त्र सोडले. 'वचन राम राज्याचे होते, पण दिले गुंडाराज,'अशा शब्दात राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचे दिले होते, दिले गुंडाराज, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.