Breaking News

लाखेफळात उभे राहिले कृषी पर्यटन केंद्र

- ग्रीन गॅलक्सी कृषी पर्यटनामुळे लूटता येणार निसर्ग सानिध्याची मजा

- लॉकडाऊनच्या काळातही वळत आहेत पर्यटकांची पाऊले 
संदीप गाडेकर । नेवासा 
नेवासा तालूक्याच्या तिर्थक्षेत्र विकासात भर घालणारा माळीचिंचोरा शिवारातील लाखेफळ येथील ग्रीन गॅलक्सी कृषी पर्यटन केंद्र सध्या तालूक्याचे लक्ष वेधून घेत आहे. या पर्यटन केंद्रात भेट दिल्यानंतर निसर्गाचे आगळे - वेगळे रुप पहावयास मिळत आसून या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जिवाचा विरंगुळा करण्यासाठी येथे आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची सोय, मुलांसाठी रेन डॉंन्स, होडीतून सफर,कॉंक्रिट तळ्यात वॉटर स्विमिंग,वॉकिंग बॉल,वेगवेगळे पशू - पक्षी व वेगवेगळे वृक्ष व विविध बागांनी हे पर्यटन केंद्र सध्या फुलून गेले आसून नैसर्गिक सौंदर्याचे खरे रुप ग्रामिण भागात डि.के.मांडलिक यांनी दहा एकर क्षेञात प्रत्यक्षात साकारल्यामुळे येथे पर्यटक आनंद लुटतांना दिसून येत आहेत.
नेवासा तिर्थक्षेञ आसलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर, मोहीनीराज मंदिर,श्रीक्षेञ शनिशिंगणापूर,देवगड येथील दत्त मंदिर,रांजणगांव येथील देवीच्या मंदिरा बरोबरच बहिरवाडी,बेल्हेकरवाडी येथील भाविकांना निसर्गाच्या सानिध्याची मजा लुटण्यासाठी नगर - औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा फाट्यापासून अवध्या दोन किलो मिटरच्या अंतरावर स्वप्नशिल्प एल् एल् पी,चे ग्रीन गॅलक्सी कृषी पर्यटन केंद्र आसून येथे आल्यानंतर पक्षी निरक्षण करण्याचा आनंद लुटण्याचा मोह पर्यटक सोडत नसून  लिंबोळी बाग,गांडूळ खत प्रकल्प, नैसर्गिक शेती व सिताफळाच्या बागे बरोबरच पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी झुलते पाळणे, मुलांना खेळण्यासाठी सी - स्वा झोके,घसरगुंड्या, खुली व्यायाम शाळा, झुलता पुल.वॉटर स्विमींग, बरोबरच शेत तळ्यात सोडलेले विविध जातीचे मासे,तसेच येथून जवळच आसलेल्या वनविभागाच्या वनराईत आसलेले मोर,लांडगे, नाथसागराच्या बॅकवॉटरमुळे वेगवेगळ्या पाहूण्या पक्षांचे आगमन पाहण्यासाठी येथे पर्यटकांची ये - जा सुरु आसते त्यामुळे येथील ग्रीन गॅलक्सी कृषी पर्यटन क्षेञाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांना राहणे व भोजनाची व्यवस्था केली जात आसल्याने पर्यटकांना येथे भेट देण्याचा मोह आवरता येत नसल्याचे वास्तव चिञ पर्यटकांच्या भेटीतून सप्रमाण सिद्ध होतांना दिसून येत आहे.