Breaking News

पिंपळगाव पिसाच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुभाषपंदरकर यांची बिनविरोध निवड, माजी आ. राहुल जगताप यांचेकडुन सन्मान !

पिंपळगाव पिसाच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुभाषपंदरकर यांची बिनविरोध निवड, माजी आ. राहुल जगताप  यांचेकडुन सन्मान !
 निवडीनंतर उपसरपंच पंदरकर व मावळते उपसरपंच खरात यांचा सत्कार करताना माजी आमदार राहुल जगताप व आदी मान्यवर (छाया; किशोर शा. थिटे श्रीगोंदा)

श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
      श्रीगोंदा तालुक्यातील  राजकियदृष्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणा-या पिंपळगाव पिसाग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक सुभाष पंदरकरयांची बिनविरोध निवड झाली. अर्ज सादर करण्याच्या विहित मुदतीत माजी आमदार राहुलजगताप यांच्या गटाचे सुभाष पंदरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले मागीलकाळात ग्रामपंचायतीचे उपसरपंच आप्पा राजाराम खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामादिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली त्यांच्या निवडीनंतर माजी आमदार जगताप यांच्या निवासस्थानीत्यांचा सत्कार करण्यात आला या ग्रामपंचायत मध्ये राहुल जगताप गटाचे ११ व विरोधीदिनकर पंदरकर गटाचे ६ सदस्य आहेत. यानिवडीनंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी उपसरपंचपंदरकर यांचे अभिनंदन केले यानिवडीसाठी मा.आमदार राहुल जगताप जेष्ठ नेते नारायणराव पाटील जगताप, मा.सरपंच सुर्यजित पवार, सरपंच सुधीरशेठ घेगडे, सुरेश भापकर, दत्तात्रय इथापे, बापूराव शेंडगे, आप्पा खरात, चेअरमन वसंतराव शिंदे,  बापूराव कुताळ, गोरख पाडळे, अमर शेख, उमेश जगताप, सचिन भोसले, शिवाजी शिंदे, संभाजी शेंडगे, बापू पारखे, निलेश सकट, सिताराम खामकर, अनिकेत जगताप, लक्ष्मण इथापे, अजिंक्य जगताप, मयूर पंधरकर, सुरेश पंधरकर, रामभाऊ सरोदे, सुखदेव कुताळ व अनेक पदाधिकारी उपस्थीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन विस्तार अधिकारी जगतापयांनी काम पाहिले तर या प्रक्रीयेत सहाय्यक म्हणुन बी.वाय मेहेत्रे व सुयश राजेभोसलेयांनी प्रक्रीया पार पाडली. सदर निवड गावच्या सरपंच सुलक्षणा पाडळे यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली. 

     गावच्या सर्वांगीन विकासासाठी कटिबध्द- 
पंदरकरमला मिळालेल्या पदाच्या कालावधीत गावच्या विकासाचीप्रलंबित राहिलेल्या कामांच्या प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा उपयोग करणार असुन समाजहितासाठिकटिबद्ध आहे. तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप यांचे मार्गदर्शनाखाली काम करणारअसल्याचे त्यांनी निवडिनंतर दै. लोकमंथन शी बोलताना सांगितले.